महाराष्ट्र राज्य - सहजयोग आश्रम विकास निधी

जय श्री माताजी

सर्व सहज योगी बंधू आणि भगिनींना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

दि 04 व 05 फेब्रुवारी रोजी प्रतिष्ठान पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय वार्षिक बैठकीत महाराष्ट्र सहज योग विकास करणे हेतू महत्वाचे २१ निर्णय घेण्यात आले आहेत . हे निर्णय गेल्या आठवड्यात व्हाट्स एप मार्फत सर्क्युलेट केले होते . त्याअनुसार प्रत्येक विषयावर कार्यवाही सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील सहजयोग आणखी वाढविण्यासाठी सहज योगाचे जिल्हानिहाय आश्रम विकसित करणे आणि 20 ते 40 वयोगटातील युवकांमध्ये सामूहिक नेतृत्व विकसित करणे हे दोन महत्वाचे प्रोजेक्ट राबविले जातील . दिवाळी पूजेच्या माध्यमातून नागपूर अकॅडेमी येथे जवळपास ऐंशी लाख रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित झाले आहे .

महाराष्ट्रात नागपूर अकॅडेमी , अमरावती , चंद्रपूर,गडचिरोली , अकोला , बुलढाणा , नासिक, धुळे , नंदुरबार, औरंगाबाद आणि बीड अश्या अनेक ठिकाणी सहज आश्रम बांधकाम सुरु आहेत. सदर आश्रम विकास करणे हेतू दोन हजार सहजीं मार्फत प्रत्येकी पाच हजार रुपये वार्षिक निधी अथवा महिन्याला रु 500 असे जमा केल्यास पुढील 3 वर्षांत सर्व ठिकाणचे आश्रम पूर्णत्वास जातील. आता पर्यंत 300 सहज योगी ह्या कार्यात जोडले गेले आहेत . जे सहज योगी नोकरी अथवा व्यवसाय करीत आहेत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 31 मार्च च्या आत आपले नाव नोंद करून डोनेशन काउंटर च्या माध्यमातून रुपये 5 हजार धनराशी द्यावी . इतरांना जेवढे शक्य होईल तेवढी मदत करावी . मागील 10 महिन्यात 200 हुन अधिक सहजींनी दर महिन्याला रु 500 जमा केले त्या द्वारे दोन जिल्ह्यांना 6 लाखाची मदत करणे शक्य झाले आहे .

सदर आश्रम विकासा बाबत माहिती maharashtrasahajayoga.org या वेबसाईट मार्फ़त उपलब्ध राहील. आपण चेक मार्फत, ऑनलाईन लिंक द्वारे अथवा QR कोड मार्फत धनराशी डोनेट करू शकाल . आपल्याला त्याची रिसीट महाराष्ट्र समिती मार्फत प्राप्त होईल . शक्यतो कॅश देऊ नये. भविष्यातील पिढी करीता आपण ह्या विषयावर गांभीर्याने कार्य करूया. हे आश्रम पुढील पिढीला सहज योगात बांधून ठेवण्यासाठी फार मोलाचे साधन असेल . विशेषतः महिला शक्ती ने ह्या अभियानात पुढाकार घ्यावा . शहरातील सहजींनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रात समतोल विकास होईल . ह्या बाबत आपल्या सूचना प्रार्थनीय आहेत . श्री माताजींच्या जन्म शताब्दी वर्ष्यात आपण ह्या कार्यास हातभार लावावा हि विनंती

धन्यवाद

जय श्री माताजी

महाराष्ट्र राज्य सहजयोग समिती

बँक अकाउंट डिटेल्स