Circulars
महाराष्ट्र राज्य युवाशक्ती समिती 2022-25 निवड संबंधी घोषणा (दि. 5 मे 2022)
जय श्री माताजी
Maharashtra Sahajayoga State YUVASHAKTI Committee List for Year 2022-25
1. State Yuvashakti Coordinator – Dhananjay Khalatkar, Nagpur (8308060006)
Vidarbh Region –
Nagpur, Bhandara,Gondiya –
Kunal Paidalwar 7276627298 and Najuka Bhandarkar 8793080015
Amravati,Yavatmal,Wardha –
Vaibhav Ghuse 7020137152 and Neha Mirani 9823542383
Akola, Buldhana, Washim ,Hingoli – Pawan Ingale 9623500729
Chandrapur, Gadchiroli – Nitin Watguhe 9764647156
North Maharashtra & Marathwada Region –
Jalgaon, Nandurbar, Dhule –
Mahesh Jamodkar 9561331314
Nashik –
Dheeraj Bhargave 9923159773
Ahmednagar – To be announced
Aurangabad – To be announced
Beed, Parbhani, Jalana – Dr. Jyoti Suryvanshi 9960202152
Nanded, Latur –
Kamal Rathod 7507299152
Western Maharashtra and Kokan Region –
Pune ,Satara,
Osmanabad,Solapur –
Paresh Patil 9623239694
Raigad,Ratnagiri –
Alok Sarang 9082461192
Kolhapur, Sindhudurg – Pravin Chopde — 9834695812
Sangli – Shreyas Mane 9373155771
सर्व सदस्यांचे महाराष्ट्र सामूहिकते तर्फे अभिनंदन. श्री माताजीं ना अपेक्षित असलेला महाराष्ट्रातील युवाशक्तीचा विकास ह्या समिती द्वारे होवो ह्या शुभेच्छा.
Jai Shri Mataji
महाराष्ट्र राज्य सहजयोग समिती
2022-25
जय श्री माताजी
महाराष्ट्रातील सर्व सहजयोगी बंधू भगिनींना सहस्रार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
प. पू. श्री माताजींच्या परमकृपेत दि. 02/04/2022 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील 3 विभागातून ( विदर्भ , उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व कोकण ) चैतन्य रथा द्वारे प्रचार प्रसाराचे कार्य आपणां सर्वांकडून सुरू झाले व सामुहिकतेत उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
चैतन्य रथाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यातील विभाग वार प्रचार प्रसाराचा कार्य अहवाल
विदर्भ :
1. शालेय कार्यक्रम — 5
जागृती मिळालेले विद्यार्थी — 300
2. सार्वजनिक कार्यक्रम — 34
जागृती मिळालेले साधक — 1687
* एकूण कार्यक्रम — 39
* एकूण जागृती मिळालेले नवीन साधक — 1987
उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा :
1. शालेय कार्यक्रम — 15
जागृती मिळालेले विद्यार्थी — 2071
2. सार्वजनिक कार्यक्रम — 77
जागृती मिळालेले साधक — 4504
* एकूण कार्यक्रम — 92
* एकूण जागृती मिळालेले नवीन साधक — 6575
पश्चिम महाराष्ट्र व कोकण
1. शालेय कार्यक्रम — 24
जागृती मिळालेले विद्यार्थी — 2185
2. सार्वजनिक कार्यक्रम — 115
जागृती मिळालेले साधक — 4659
एकूण कार्यक्रम — 139
एकूण जागृती मिळालेले नवीन साधक — 6844
या कार्यात योगदान दिलेल्या सर्व सहजींचे हार्दिक अभिनंदन.
चैतन्य रथ मे आणि जून महिन्यात उर्वरित जिल्ह्यांत जाणार आहे.
प.पू. श्री माताजींच्या परमकृपेत उर्वरित प्रचार प्रसार कार्यक्रमात आपण सर्व जण अधिक उत्साहाने सहभागी होऊन जास्तीत जास्त साधकांना जागृती देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू या व श्री माताजींचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू या.
येत्या 21 जून 2022 ला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्या निमित्ताने सर्वत्र जागृती सप्ताहाचे आयोजन करून , दिवस भर सहजयोगाचे प्रदर्शन आयोजित करून तसेच सर्व प्रकारच्या कार्यालयांमध्ये आधीच पुर्व परवानगी घेऊन नवीन साधकांसाठी जागृती अभियान राबविणे. हे महान कार्य पूर्ण करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे हि विनंती.
विश्व परिवर्तनाचे महान कार्य श्री माताजींच्या परमकृपेत पुर्ण करण्यासाठी श्री माताजींकडे मनोभावे शक्ती मागू या.
आता एकच ध्यास —
गाव तिथे ध्यानकेंद्र, घर तेथे श्री माताजी
बोलो आदिशक्ति श्री माताजी श्री निर्मला देवी की जय
????????????????????????????
जय श्री माताजी
महाराष्ट्र राज्य सहजयोग समिती
(2022-25)
जय श्री माताजी
महाराष्ट्रातील सर्व सहजयोगी बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी नूतन वर्ष आपणां सर्वांना आनंद , प्रेम, शांती, समाधान देणारे व चैतन्यमयी जावो. गुढीपाडव्याच्या या शुभदिनी आपण सर्व जणांनी चैतन्याची गुढी उभारली असणार.
नूतन राज्य समितीने 22 मार्च 2022 रोजी नागपूर अकॅडमी येथे पूर्व समितीकडून कार्यभार स्वीकारला आहे.
चैतन्य रथ
श्री माताजींच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर आपण विविध उपक्रमांद्वारे आत्मसाक्षात्काराचे कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रासाठी श्री माताजींनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या.
2 एप्रिल 2022 पासून महाराष्ट्रातील 3 विभागांत ( विदर्भ , मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभाग ) सहज प्रचारासाठी चैतन्य रथ सामूहिकतेच्या सहभागातून कार्यरत रहाणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन विभागीय समन्वयक यांच्या माध्यमातून आपणां पर्यंत पोहोचले असेलच.
एप्रिल , मे व जून या 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात एक लाख साधकांना आत्मसाक्षात्कार मिळावा
हि शुद्ध इच्छा आपण श्री माताजींच्या चरणी अर्पण करू या व एकजुटीने माध्यम बनून कार्याला लागूया. कर्त्या करवित्या श्री माताजी आहेत.
चैतन्य रथाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार कार्य करतांना जास्तीत जास्त पत्रक वाटप व उद् घोषणेद्वारे श्री माताजी व सहजयोगाचे नाव सर्वत्र परिचित होईल याची काळजी आपल्याला घ्यावयाची आहे.
सर्व सहजयोग्यांनी प्रचार प्रसार कार्यात संपूर्ण शक्ती निशी सहभागी व्हावयाचे आहे.
दररोज सकाळी विविध संस्था , सार्वजनिक ठिकाणी व सायंकाळी सार्वजनिक कुंडलिनी जागृती चा कार्यक्रम आयोजित करावा.
दर रविवारी सुट्टीचा वार असल्याने सायंकाळचा कार्यक्रम सहज संगीताचा समावेश करून घेण्यात येईल. संबंधित जिल्हा समन्वयक आणि जिल्हा प्रचार प्रमुख सर्व नियोजन करत आहेत.
ऑनलाईन साप्ताहिक ध्यानकेंद्र
नविन साधकांना जागृती दिल्या नंतर सहज योग शिकण्यासाठी ऑनलाईन साप्ताहिक ध्यानकेंद्र Learning Sahaja Yoga YouTube चॅनेल मार्फत दर शनिवारी सायंकाळी 6.30 वा प्रतिष्ठान पुणे येथून लाईव्ह प्रसारित होईल.
श्री महालक्ष्मी पूजा 2022
आंतरराष्ट्रीय दिवाळी पूजा महोत्सव आणि सहज विवाह या वर्षी 28, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी नागपूर अकॅडमी येथे आयोजित केलेले आहेत.
ह्या पूजेच्या आयोजनाची पूर्व तयारी 22 मार्च 22 पासून सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याला पूजेच्या आयोजनात विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आपल्या जिल्हा समन्वयक यांचे मार्फत आपण स्वयं सेवक म्हणून कार्यात सक्रिय व्हावे हे नम्र आवाहन.